प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि लेखिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

0
629

पुणे, दि.१९ (पीसीबी) : प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची आज पुण्यात प्राणज्योत मावळली. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांनी अखेर आज पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात वयाच्या ७८ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

ज्यांना देशविदेशात पुरस्कारांनी गौरवण्यात आलं त्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने अनेक प्रतिभावान चित्रपट बनवले. सुमित्रा यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि लघुपटांचं लिखाणही केलं आहे. झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा बाई हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट पाणी यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुक्ती, चाकोरी, लहा, थ्री फेसेस ऑफ टुमारो असे लघुपट बनवले. सुमित्रा यांना त्यांच्या योगदानाबद्दल चित्र रत्न पुरस्कार आणि कामधेनू पुरस्कारही मिळाला.