किर्तनकार मंगलाताई कांबळे यांचे निधन

0
304

पिंपरी, दि.18 (पीसीबी) : ह.भ.प.किर्तनकार मंगलाताई नंदकुमार कांबळे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.वारकरी सांप्रदायातील एक अभ्यासु व्यक्तीमत, संत वांग्मयाच्या गाढ्या अभ्यासक असलेल्या मंगलाताईंच्या जाण्याने समाजाची अध्यात्मिक हानी झाली आहे. आपल्या भक्तीमय, भावपुर्ण वाणीने त्यांनी पिंपरी चिंचवड परीसरात आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

फक्त महिलांची स्वतंत्र दिंडी त्यांनी सुरु केली. दरवर्षी आषाढी वारीला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळ्यामध्ये देहु ते पंढरपुर अशी त्यांची दिंडी गेली अनेक वर्षे पायी जात होती. त्यांच्या जाण्यान खरच खुप वाईट वाटले, अभ्यासु व्यक्तीमत्व आपल्यामधुन निघुन गेले अशी प्रतिक्रीया भविकानी व्यक्त केली.