प्रसिद्ध ज्योतिषाचार्य उमेश स्वामी गोल्डन लाइफ टाइम व आयकॉन अवॉर्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित

0
498

लुधियाना, दि. २९ (पीसीबी) – एस्ट्रो वेदांग फाउंडेशन ऑफ एस्ट्रोलॉजी यांच्याकडून पिंपरी चिंचवड( कासारवाडी ) येथील नामवंत व प्रसिद्ध ज्योतिषाचार्य उमेश स्वामी यांना गोल्डन लाइफ टाइम व आयकॉन अवॉर्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित केले.

पंजाब राज्यातील लुधियाना येथे ज्योतिष संमेलन आयोजित केले होते. या संमेलनामध्ये विश्वविख्यात ज्योतिषी सुरेश श्रीमली जी लाल किताब विशेषतज्ज्ञ जी डी वशिष्ठ जी ज्योतिषी डॉक्टर वाई के राखी, सर्व ब्राह्मण सभा महासभा के अध्यक्ष शुभेश शर्मन, डॉक्टर अनिल मित्रा व पाल बालाजी ज्योतिष संस्थान जोधपुर के विश्वविख्यात विश्लेषक डॉक्टर अनिल व्यास हे उपस्थित होते आयोजक ईसाक्षी भार्गव व राजेश कुमार यांनी उमेश स्वामींचे स्वागत केले व सन्मानचिन्ह, मानपत्र गोल्ड मेडल व श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती ह्या वस्तू देऊन उमेश स्वामी यांना सन्मानित करण्यात आले .

उमेश स्वामी हे पिंपरी चिंचवड मध्ये अनेक वर्षापासून ज्योतिष व वास्तू सल्लागार यांचे काम करतात व अनेक दिवाळी अंकामध्ये , वृत्तपत्र यांच्यामध्ये ज्योतिष व वास्तू विषयावरती च लिखाण असते व त्यांचे दर वर्षी भविष्य कोश हे बुक प्रसिद्ध करतात