प्रश्न खोटे बाद दिल्याचा नव्हे, तर माझ्या आत्मसन्मानाचा

0
416

मेलबर्न, दि. 2 (पीसीबी) : बाद झाल्याचे अपील झाले, की पंचांच्या निर्णयाची देखिल वाट न पाहता खेळपट्टी सोडणारा सुनील गावसकर त्या वेळी पंचांनी पायचित बाद दिल्यावरही खेळपट्टी सोडायला तयार नव्हता. आपण बाद नसल्याचे त्याचे म्हणणे होते. अशा वेळी अचानक तो आपल्या सहकारी चेतन चौहानला बरोबर घेत खेळपट्टी सोडून चालू लागला. काय झाले कोणाला कभारळत नव्हते. पण, घडत होते ते विचित्र होते इतके नक्की. खोटे बाद दिल्याने गावसकर चिडला, असेच सर्वांचे म्हणणे पडले. आज ऑस्ट्रेलियाताच बोलताना त्याने प्रथमच आपल्या कृतीबाबत खेद व्यक्त न करता त्यामागील खरे कारण सांगितले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मला ‘गेट लॉस्ट’ म्हणून चिडवले.

भारताच्या १९८१च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या मेलबर्न कसोटीत घडलेला हा प्रसंग. आजही आठवला की आजही चिडलेला गावसकरचा आणि चेतन चौहानला आपल्याबरोबर पतरण्याचे हातवारे करणारा गावसकरचा चेहरा समोर येतो. हा प्रसंग झाला. सामना संपला, भारताने विजय मिळविला. पण, लक्षात राहिली ती गावसकर यांची कृती. कुणी गावसकर यांना अखिलाडू म्हटले, तर कुणी गावसकर चुकला असे सांगितले. खुद्द गावसकर यांनी देखील पुढे वारंवार आपल्या कृतीबद्दल खेद व्यक्त केला होता. आपली कृती वादग्रस्त असल्याचे त्यांनी कबूल केले होते. पण, आज इतक्या वर्षांनी त्या प्रसंगाविषयी बोलायचे म्हटल्यावर आणि ते देखिल ऑस्ट्रेलियात ही संधी मिळाल्यावर गावसकर यांनी खरे कारण सांगतिले. सेव्हन क्रिकेटच्या एका कार्यक्रमात बोलताना गावसकर यांनी हा गौप्यस्फोट केला. गावसकर म्हणाले,’प्रश्न मला खोटे पायचित बाद दिल्याचा नव्हता, तर माझ्या आत्मसन्मानतेचा होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्या वेळी मला ‘गेट लॉस्ट’ म्हणाले होते. त्या रागाने मी चेतनला आपल्याबरोबर परतायला सांगतिले.’

त्या ८१च्या मालिकेत डेनिस लिली याच्या एका इन-कटरवर गावसकर पायचित असल्याचा कौल पंच रेक्स व्हाईटहेड यांनी दिला होता. व्हाईटहेड यांचा पंच म्हणून हा केवळ तिसराच सामना होता. पण, फलंदाज गावसकर यांना चेंडू बॅटला लागल्याची खात्री होती. खेळपट्टीवर प्रदिर्घ थांबून होता. त्याने तीव्र निषेध व्यक्त केला होता. गावसकर यांनी त्या वेळी पंचांकडेबघून बॅट पॅडवर आपटून आपला राग व्यक्त केला. त्या वेळी गावसकरने ७० धावा केल्या होत्या. गावसकरसाठी ती मालिका अपयशी ठरली होती. ती ७० धावांची खेळीच त्याची सर्वोत्तम होती.

गावसकर यांचे ऐकून त्या वेळी चेतन चौहानही चालायला लागला होता. तेव्ही सीमारेषेवर संघ व्यवस्थापक शाहिद दुराणी आणि सह व्यवस्थापक बापू नाडकर्णी यांनी त्याला अडवले. तेव्हा देखील गावसकरने चेंडूने बॅटची बाहेरची कड घेतल्याचे निदर्शनास आणले होते. इथपर्यंतच सर्वांना माहित होते. त्यामागचे खरे कारण आज प्रथमच समोर आले.