सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसीला केंद्राची मान्यता; आजपासून देशभरात सुरू होणार ड्राय रन

0
268

मुंबई,दि.०२(पीसीबी) – करोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासाठी दिल्लीमध्ये तज्ज्ञांची महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता मिळाल्यामुळे देशात लसीकरणाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये ३० कोटी लोकांनी लस देण्यात येण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या या लसीला मान्यता देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची ही बातमी सर्वांत मोठी आहे. फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या तिघांनी लस आणि त्याचे परिणाम यासंदर्भात प्रेझेंनटेशन दिलेले होते. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपताकलीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे.

उद्यापासून ड्राय रन सुरू होणार आहे. करोना लसीकरणाच्या तयारीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कोविशिल्डला मान्यता देण्यासाठू समितीच्या यापूर्वीही दोन बैठका झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये लस तयार करणाऱ्या कंपन्यांकडून काही माहिती मागविण्यात आली होती.