पोलिसांसमोर रिक्षाचालकाचा चाकूने भोसकून निघृर्ण खून

0
3051

हैदराबाद, दि. २९ (पीसीबी) – जुन्या हैदराबादच्या नयापूल भागात एका रिक्षाचालकाचा दुसऱ्या रिक्षा चालकाने पोलिसांसमोरच निर्दयीपने चाकून भोसकून खून केला. ही घटना बुधवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास घडली.

शकीर कुरेशी असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मीरचौक पोलीसांनी आरोपी दुसरा रिक्षाचालक अब्दुल खाजा याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकीर आणि अब्दुल दोघे ही रिक्षाचालक आहेत. अब्दुल याने शकीरला त्याच्या मालकीचा रिक्षा भाडेत्तवावर चालवण्यास दिली होती. पण शकीर याने अब्दुलची रिक्षा तिसऱ्या एकाला चालवण्यासाठी दिली होती. या गोष्टीचा राग आल्याने शकीरने नशा केली आणि बुधवारी रात्री खाटीक जनावर कापतात त्या चाकूने जुन्या हैदराबादच्या नयापूल भागात उभा असलेल्या शकीरवर वार केले. तसेच तु मरायलाच पाहिजेस असे म्हणून निर्दयपने चाकून वारंवार भोसकून त्याचा खून केला. मीरचौक पोलीसांनी अब्दुल याला अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेचा एकाने व्हिडीओ देखील काढला आहे. यामध्ये एक ट्रॅफीक पोलीस अब्दुल याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये काही पोलीस कॉन्स्टेबल देखील तिथे उभे असल्याचे दिसत आहे पण कोणीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलीसांबद्दल तीव्र नाराजी आहे.