मराठा आरक्षण; माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण – धनंजय मुंडे

0
1074

मुंबई,  दि. २९ (पीसीबी) – राज्य सरकारने विधानपरिषदेत सादर केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयकाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने आज (गुरूवार) पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकाला आज विधीमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षीय आमदारांचे आभार मानले. मूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती अहवालात केली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा अहवाल  सभागृहात सादर केला. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.