पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जाळ्यात; तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई    

0
1345

तळेगांव, दि. २४ (पीसीबी) – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तर टोळीतील पाच जण पसार झाले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २३) रात्री सव्वा आठच्या सुमारास भंडारा डोंगराच्या पायथ्याशी करण्यात आली.

पोलीस नाईक प्रशांत  मधुकर सोरटे यांनी फिर्याद दिली आहे. तर या प्रकरणी राजेंद्र प्रकाश काशिद (वय २२ रा. खरपुढी, ता. खेड), सुरज पांडुरंग मोरे (वय २५, रा. मोरेवस्ती, चिखली), राकेश वासुदेव येवले (वय. २७), सनी शिंदे, पिल्या ऊर्फ गुरूदास तेलंग आणि पांड्या आवटे (सर्व रा. कान्हेवाडी, ता.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण रस्त्यावरील हरे कृष्ण पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री आरोपी दरो़डा टकण्याच्या तयारीत होते. तसेच त्यांच्याकडे बेकायदेशीर गावठी पिस्तूल, जिंवत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी राजेंद्र काशिद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पोलिसांची गाडी पाहताच पाच जणांनी धूम ठोकली.

या प्रकरणाचा अधिक तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस करत आहेत.