पेट्रोल – डिझेलच्या दरात सातत्याने कपात

0
1038

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) –  आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने कपात होत आहे.

आज मुंबईत पेट्रोलच्या दरात २१ पैशांनी कपात झाली आहे. तर, डिझेलचे दरही १८ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी ८४.२८ रुपये मोजावे लागणार आहेत, आणि प्रति लिटर डिझेलसाठी ७६.८८ रुपये मोजावे लागतील.