धक्कादायक: रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप

0
2104

बरेली, दि. ४ (पीसीबी) – बदायू रोडवरील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.३१ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास घडली.  गँगरेपनंतर तीन दिवसांपर्यंत मुलगी तडफडत होती.

याप्रकरणी बरेली पोलिसांनी शनिवारी (दि.३) रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बदायू रोडवरील एका रुग्णालयातील आयसीयुमध्ये पीडित अल्पवयीन मुलगी उपचार घेत होती. यावेळी रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांनी तिला आधी नशेचे इंजेक्शन दिले, मग ती बेशुद्ध झाली. त्या वेळी तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला होता. कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि हात-पायही बांधून टाकले. यानंतर सर्वांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घटनेनंतरही पीडिता आयसीयूमध्येच होती. यादरम्यान जेव्हा तिचे वडील भेटायला आले तेव्हा पीडितेने इशाऱ्यामध्ये घटनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कळले नाही. तीन दिवस ती तळमळत होती. शुक्रवारी आयसीयूतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडितेने या घटनेबद्दल आपल्या आजीला सांगितले. माहिती मिळताच कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. बलात्काराचा आरोप रुग्णालयाच्या एक कंपाउंडर व ४ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आहे. पीडितेला मेडिकल चाचणीसाठी पाठवण्यात आले असून मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती बरेलीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे दिली.