पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासनाला आदेश

0
617

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील पुराची गंभीर स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती.

मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सातारा, सांगली, कोल्हापुरातील पुराचा आढावा घेतला. बैठकीअगोदर पुरग्रस्तांना स्वच्छ पाणी, जेवण देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.