पुण्यात वकिलाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण

0
1428

पुणे, दि. २४ (पीसीबी) – लाच मागीतल्याची तक्रार केल्याच्या रागातून एका वकिलाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ससून रुग्णालयाजवळील न्यु सेंट्रल बिल्डिंग येथे घडली.

अॅड. उमेश चंद्रशेखर मोरे (रा. बालाजीनगर, धनकवडी) असे धमकवण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सराईत गुन्हेगार ऋषीकेश बारटक्के आणि शहा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. उमेश मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची तक्रार दिली होती. त्यानुसार अॅड. शेंडे याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपी ऋषीकेश बारटक्के यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीबाबत चौकशी केली. ही जागा सध्या आमच्या ताब्यात आहे. या जागेचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेल्याने ऋषीकेश बारटक्के आणि शहा यांना राग आला होता. २७ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजता ते सेंट्रल बिल्डिंग येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात आले होते. तेथून परत जात असताना मोरे यांना बारटक्के याने रस्त्यात अडवून तक्रार का दिली असे विचारुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे अधिक तपास करत आहेत.