पुण्यात ‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी नाकारला सत्कार

0
1340

पुणे, दि. २० (पीसीबी) – पुण्यातील सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार विशेष सत्कार नाकारला. मुख्यमंत्र्यांना सत्कारावेळी  माधुरी मिसाळकडून देण्यात येणार पुष्पगुच्छ  प्लास्टिकचा असल्याने त्यांनी तो नाकारल्याचे सांगितले जात आहे.   

पुष्पगुच्छाला प्लास्टिकचे आवरण असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तो पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. या कृतीतून मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिक बंदीबाबत आपण कधी  सर्तक आणि जागरुक असल्याचे दाखवून दिले आहे.

दरम्यान, यापूर्वी काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा संबंध असलेल्या भेटवस्तू स्वीकारल्याने राजकीय नेत्यांवर टीका  करण्यात आल्या आहेत. ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन कळमळकर  उपस्थित होते.