शिर्डीत रविवारी उध्दव ठाकरेंची तोफ धडाडणार; लोकसभेचे रणशिंग फुंकणार

0
539

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाल्यानंतर आता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या रविवारी ( दि.२१)  अहमदनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी जाहीर सभांचे  आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता शिर्डीमध्ये तर दुपारी १ वाजता नगर शहरात सभा होणार आहे. या दोन्ही जाहीर सभांच्या माध्यमातून शिवसेना लोकसभेचे रणशिंग सेना फुंकणार असल्याचे सूत्रांकडून समजते.