पुण्यातील मंगळवार पेठेत वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न

0
377

पुणे, दि. १३ (पीसीबी) – परिसरात दहशत माजवण्यासाठी अज्ञात टोळक्यांकडून पाच ते सहा वाहनांवर दगडफेक करुन तसेच धारदार हत्यारांनी तोडफोड करुन नुकसान करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास मंगळवार पेठेतील कमला नेहरु हॉस्पिटलमागील झोपडपट्टीमध्ये घडली.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंगळवार पेठेतील कमला नेहरु हॉस्पिटलमागील झोपडपट्टीमध्ये अज्ञात तरुण शिरले. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. तसेच धारदार हत्यारांनी तोडफोड करुन नुकसान केले. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरन आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. फरासखाना पोलीस सीसीटीव्ही फुटेजव्दारे आरोपींचा शोध घेत आहेत.