आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील – मनोहर जोशी

0
364

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे.   ते मुख्यमंत्री झाले तर आवडेल,  असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी म्हटले आहे.  आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जोशी  आले होते.  यावेळी  त्यांनी आदित्य ठाकरे यांनी  निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे म्हटले आहे.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील की नाही याबाबत विचारले  असता जोशी म्हणाले की,  मी जोशी आहे, पण ज्योतिषी नाही. त्यामुळे असे घडेल तसे घडेल, असे सांगणे कठीण आहे. आदित्य ठाकरे यांनी अगदी अल्पकाळात राजकीय जीवनात स्थैर्य मिळवले आहे. त्यांचे हितचिंतक भरपूर आहेत, त्यापैकी मी एक आहे.

आदित्य ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात यावे. लोकशाही मानतो, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा निवडणूक नको, असे म्हणू शकत नाही. आपल्या आजोबा, वडिलांप्रमाणे यांच्यासारखे नामवंत व्हावे, यासाठी शुभेच्छा’.