पुणे विमान तळावर महिलेकडून १९ लाखांची चार सोन्याची बिस्किटे जप्त

0
572

पुणे, दि. १६ (पीसीबी) – एका महिलेने बुटांमध्ये लपवून आणलेली १८ लाख ९० हजार रुपये किमतीची ५५७ ग्रॅम वजनाची सोन्याची चार बिस्किटे पुणे विमान तळावर सीमा शुल्क विभागाने जप्त केली आहेत.

उषा सिंह असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला गोवा ते पुणे असा प्रवास करत असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी भारतीय सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा ते पुणे या स्पाईट जेटच्या विमानातून प्रवास करुन उषा सिंह या सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती कस्टमच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार कस्टमच्या अधिकार्‍यांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी या महिलेकडे १८ लाख ९० हजार रुपये किमतीची ५५७ ग्रॅम वजनाची सोन्याची चार बिस्किटे आढळून आली. ही सोन्याची बिस्किटे तीने शूजमध्ये काळ्या रंगाच्या टेपमध्ये गुंडाळून ठेवली होती. या सोन्यावर सिंगापूरचा हॉलमार्क आहे. कस्टमचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.