रावण टोळीचा मोरक्या “ससा” पिस्तुलासह अटक

0
1439

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला रावण टोळीचा मोरक्या ससा उर्फ सागर दशरथ वाघमोडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाने एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

ससा म्हणून ओळख असणाऱ्या सागर विरोधात पिंपरी, चिंचवड, देहुरोड आणि पुणे या ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र हा आदेश जुगारुन तो बिंधास्तपणे शहरात वावरत आहे, अशी माहिती विशेष शाखेच्या पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी निगडी परिसरात सापळा रचून सागर याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन सागरला अटक केली आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.