पुणे विभागातील 17 हजार 54 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

0
243

– विभागात कोरोना बाधित 28 हजार 248 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे, दि.1(पीसीबी) : पुणे विभागातील 17 हजार 54 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 248 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 10 हजार 93 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 551 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.37 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.90 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 23 हजार 321 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 731 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 824 आहे. कोरोनाबाधित एकूण 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 425 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.88 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.28 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत आज पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 274 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1186, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 35, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1050 रुग्ण असून 740 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 265 आहे. कोरोनाबाधित एकूण 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 2 हजार 644 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 624 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 753 आहे. कोरोना बाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 383 रुग्ण असून 239 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 132 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 850 कोरोना बाधीत रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 119 आहे. कोरोना बाधित एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 78 हजार 352 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 74 हजार 846 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 506 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 46 हजार 270 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 28 हजार 248 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.