पित्याच्या कर्तृत्वावर उध्दव ठाकरेंचे राजकारण; अजित पवारांचा पलटवार  

0
830

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ग्रामीण भागात बाप, तर शहरी भागात वडील असा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. पाच वर्षे झाली, तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम रेंगाळले आहे. यावर  चांगल्या भावनेने भूमिका व्यक्त केली होती. मात्र, सत्य बोचल्याने त्यांना कोल्हापुरी मिरच्या झोंबल्या आहेत. त्यांनी माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली, तरी त्याकडे लक्ष देणार नाही. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या अग्रलेखातील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांची खोपडी रिकामी  आहे. ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही, अशा जहरी शब्दांत शिवसेनेने ‘सामना’ च्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर शरसंधान साधले आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत, अशी टीकाही या अग्रलेखात कऱण्यात आली आहे. यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे.

सत्तेत राहायचे आणि  विरोधक म्हणून कामगिरी करायची, शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका गांढूळांसारखी असल्याचा पुनरूच्चार केला. तर शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांनी पक्ष सुरू केला. त्यामुळेच ऋण सर्वच मान्य करतो. कोणातरी पक्ष सुरू केल्याशिवाय त्याचे काम पुढे चालत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यामुळेच उध्दव ठाकरे पित्याच्या कर्तृत्वावर राजकारण करत आहेत, असे अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.