पिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा

0
705

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन एका वृध्दाला ९८ हजारांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.९) सकाळी पावणे दहा ते साडेदहाच्या सुमारास घडली.

श्रामदीन रामरत्न वाजपेयी (वय ६७, रा. रोझलॅन्ड रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर) असे गंडा घालण्यात आलेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल धारकाविरोधात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पावणे दहा ते साडेदहाच्या सुमारास फिर्यादी श्रामदीन वाजपेयी यांच्या मोबाईलवर फोन करुन त्यांना चेक कॅन्सल करुन दोतो असे सांगितले. तसेच त्यांच्या एसबीआय बँकेची गोपीनीय माहिती घेतली आणि त्यांच्या बँक खात्यातून ९८ हजार रुपये काडून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.