बावधन येथील खंडोबा मंदिरात चोरी; ४४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
477

हिंजवडी, दि. १० (पीसीबी) – बावधन येथील खंडोबा मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही धक्कादायक घटना बावधन येथील भुंडे वस्तीतील खंडोबा मंदिरातून रविवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास समोर आली.

याप्रकरणी सुर्यकांत पांडुरंग भुंडे (वय ३३, रा. भुंडे वस्ती, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील भुंडे वस्तीतील खंडोबा मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. पहाटेच्या सुमारास मंदिर उघडण्यास आलेल्या सुर्यकांत यांना हि बाब निदर्शनास आली. त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.