पिंपळे सौदागरमध्ये तिघावर धारदार हत्याराने वार

0
1117

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चौघा जणांनी मिळून तिघांवर धारदार हत्याराने वार केले. ही घटना बुधवार (दि.३) रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील संदीप काटे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर घडली.

रविंद्र बंडु रगडे (वय २९, सुदाम काटे, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर), सिध्दार्थ रगडे (वय १७), रवि विलास सकटे असे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विकास भिमा गायकवाड, प्रविण म्हस्के (दोघे. रा. बौध्द विहार शेजारी, पिंपळे सौदागर) यांच्यासह दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी विकास, प्रविण आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदारांचे सिध्दार्थ आणि रवि या दोघांसोबत भांडण झाले होती. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या रविंद्र यांच्यासह सिध्दार्थ आणि रवि या दोघांवर आरोपींनी धारदार हत्याराने वार करुन फरार झाले. याप्रकरणी सांगवी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.