दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0
906

पुणे, दि. ५ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रवारी, मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे  वेळापत्रक आज (शुक्रवारी) जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा १ मार्च रोजी सुरू होणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 

दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च दरम्यान होणार  आहे. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २२ मार्च  यादरम्यान घेण्यात येणार आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात येते. गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, म्हणून दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.