पिंपळे सौदागरमधील प्रत्येक सोसायटीने वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबवावा – नगरसेवक शत्रुघ्न  काटे

0
567

चिंचवड, दि. २० (पीसीबी) –  नागरिकांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत कसे बनवावे? किंवा ओला कचऱ्याचे काय करावे? याबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. ओला कचरा ही एक खूप गंभीर समस्या असून यावर योग्य तो तोडगा काढला पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढीसमोर एक न सुटणारे संकट उभे राहील. त्यामुळे पिंपळे सौदागर मधील प्रत्येक सोसायटी मध्ये वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबविण्यात यावा, असे मत नगरसेवक शत्रुघ्न  काटे यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले.

‘वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प’  या ओल्या कच-यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणा-या प्रकल्पासंदर्भात  पिंपळे सौदागर येथील ‘नम्रता मॅजिक’ या सोसायटीत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन मयुरी गोसावडे, रमेश काटे , सोसायटीचे सेक्रेटरी अभिजीत उल्हे, चेअरमन  अशोककुमार शर्मा यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी  माय ग्रीन बिनचे संचालक अमित रॉय  यांनी वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाअंतर्गत ओल्या कचऱ्यापासून आपण खत कसे बनवू शकतो, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी नगरसेविका निर्मलाताई कुटे , निलेश पाटील , साई वास्तु सोसायटीचे चेअरमन विशाल शिंदे, सेक्रेटरी  कुंभार, मयुरी गोसावडे, कॅस्टेलीया सोसायटीचे चेअरमन विजय विकास  आणि साई प्रेम पार्क, जॅस्मीन, साई वैभव सोसायटीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.