राम मंदिराचा मुद्दा घ्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ; विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसला ऑफर

0
500

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केला तर, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, अशी ऑफर  विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसला दिली    आहे. भाजप सरकारचा सध्याचा कार्यकाळ काही महिने उरला आहे. त्यामुळे या कार्यकाळात राम मंदिराची निर्मिती होणे शक्य नाही आणि तशी आशाही नाही, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ज्याप्रमाणे एखाद्या बाळाच्या जन्मासाठी नऊ महिने वाट पाहावी लागते. तशीच प्रभू श्रीरामाच्या भक्तांना राम मंदिरासाठी २०१२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कधीही राम मंदिराचा मुद्दा नव्हता, याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा समाविष्ट केला, तर विश्व हिंदू परिषद काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत विचार करेल, असे आलोक कुमार  म्हणाले