पिंपळे निलख येथे मित्रानेच केला मैत्रीणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

0
2056

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – मैत्रीणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर तिच्या मित्रानेच मारहाण करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत अश्लिल चाळे करुन विनयभंग केला. इतकेच नाही तर त्या तरुणीचा फोटो काडून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या घरच्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) दुपारी दिडच्या सुमारास पिंपळे निलख येथील बागेत घडली.

याप्रकरणी पिडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभि दिलीप सपकाळ (वय ३४, रा. थेरगाव) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास पिडित तरुणी ही तिच्या मैत्रीणीला पिंपळे निलख येथील बागेत भेटण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांचा मित्र अभि सपकाळ देखील तेथे होता. यावेळी आरोपी अभि याने पिडितेला जवळ ओढून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत अश्लिल चाळे करुन विनयभंग केला. इतकेच नाही तर पिडितेचा फोटो काडून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या घरच्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अभि विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.