पिंपळे निलख येथे मित्रानेच केला मैत्रीणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

0
419

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – मैत्रीणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर तिच्या मित्रानेच मारहाण करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत अश्लिल चाळे करुन विनयभंग केला. इतकेच नाही तर त्या तरुणीचा फोटो काडून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या घरच्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) दुपारी दिडच्या सुमारास पिंपळे निलख येथील बागेत घडली.