पिंपळेसौदागरमध्ये सीएम चषक रांगोळी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
1234

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पिंपळेसौदागरमध्ये लिनीअर अर्बन गार्डन येथे सीएम चषक चित्रकला स्पर्धा आणि पृथ्वीराज मंगल कार्यालयात सीएम चषक रांगोळी स्पर्धा रविवारी (दि. २४) घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनखाली ही स्पर्धा घेण्यात आली. भाजप नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, स्वीकृत सदस्य संदीप नखाते यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले होते. स्पर्धेमधे सुमारे दोनशे मुलांनी सहभाग नोंदवला. लहान मुलांसोबत पालकांनी देखील सहभागी झाले होते. स्पर्धकांनी बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्री-भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, निसर्गचित्र या समाज जागृती करणाऱ्या विषयांवर चित्र रेखाटन केले. स्पर्धेत सहभागी मुलांना चित्रकलेच्या उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय कुटे,जगन्नाथ काटे, नीतीन कुंजीर, श्याम कुंजीर, कैलास कुंजीर, सावंत, सुप्रिया पाटिल, राजेश पाटिल, संतोष सिंग, रोहिदास गवारे आदी उपस्थित होते.

चित्रकला स्पर्धेत महिलांनी बेटी बचाव बेटी पढाओ, स्त्री-भ्रूण हत्त्या, भाजप सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, लेक वाचवा लेक शिकवा, आर्थिक दरीद्रय-सामाजिक समस्या, सेव अर्थ या समाजिक विषयांवर रांगोळी काढली. स्पर्धेत सहभागी महिलांना पेनचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे ४० महिलांनी सहभाग नोंदवला. अक्षय घोळवे, विनोद तापकीर, संतोष अढाघळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी कुंदा भिसे, भोला काटे, वैजंतीमाला सावंत, कंचन काटे आदी उपस्थित होते.