न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

0
446

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले आहे. तर महेंद्रसिंह धोनीचेही न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी पुनरागमन झाले आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कृणाल पांड्याचे संघामध्ये स्थान कायम आहे.

तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला १२ जानेवारीपासून सिडनीमधून सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरी वनडे १५ तारखेला ऍडलेडमध्ये, तिसरी आणि शेवटची वनडे १८ तारखेला मेलबर्नमध्ये होईल. यानंतर भारताची न्यूझीलंडविरुद्ध ५  एकदिवसीय सामन्यांची मालिका  २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.  तर ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० मॅचची सीरिज खेळवली जाईल.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी