पिंपळेसौदागरमध्ये मैत्रीदिनानिमित्त मुलांना शालेय साहित्य वाटप

0
416

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – जननी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मैत्री दिनाच्या निमित्ताने (फ्रेंडशिप डे ) पिंपळेसौदागर येथील साई अंबिअन्स – व्हिजन सोसायटी मध्ये घरेलू कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शत्रूघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक नागरगोजे, उद्योजक दीपक गांगुर्डे, साई अंबिअन्स – व्हिजन सोसायटी  चेअरमन योगेश मैद, विजय पाटील, सावळे, कांतीलाल पुरी तसेच मोठ्या संख्येने सोसायटीतील सदस्य आणि मुलांचे पालक उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वांना संबोधित करताना जननी चॅरिटेबल ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  शिवाय अश्या या सामाजिक  उपक्रमात जननी चॅरिटेबल ट्रस्टला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन काटे यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राजक्ता फुके यांनी केले. तर संदीप फुके यांनी आभार मानले. दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी जननी चॅरिटेबलच्या वतीने दुष्काळग्रस्थ भागातील मंगळापुर येथील ६५ गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते.