पिंपळेसौदागरमध्ये कँडल मार्च काढून २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

0
646

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – पिंपळेसौदागरमध्ये सोमवारी (दि. २६) कँडल मार्च काढून मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, कुंदा भिसे, संजय भिसे, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनचे सदस्य,पिंपळे सौदागर हास्य क्लबचे सदस्य, नवचैतन्य हास्य क्लबचे सदस्य , परिसरातील सोसायट्यांचे पदाधिकारी, महिला आणि लहान मुले उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबाळे हे पोलिस दलातील अधिकारी देशासाठी शहीद झाले. या शहिदांचे बलिदान देशवासीय सदैव जिवंत ठेवतील. भावी पिढी सुद्धा या सर्वांचे देशप्रेम कधी विसरणार नाही.”

नगरसेविका निर्मला कुटे, कुंदा भिसे तसेच काही जेष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच २६/११ च्या पाकिस्तान पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.