पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांच्या निधीतुन धान्य वाटप करण्यात यावे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांची आयुक्तांकडे मागणी

0
755

 

भोसरी, दि.१६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांच्या निधीतुन धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी शहर सुधारणा समितीचे सभापती राजेंद्र किसनराव लांडगे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणु COVID-19 संसर्गजन्य आजाराचा फैलाव झालेने संपुर्ण शहरात संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. तसेच या विषाणुचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता शहरातील अन्न धान्याचे दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार परगावातील/परप्रांतातील नागरिकांना कुठेही न जाण्याचे आदेश दिले आहेत, त्या आदेशाचे पालन करुन बरेचशे नागरिक हे इतरत्र कुठेही न जाता, आहे त्या ठिकाणीच राहात आहेत. तसेच शहरातील बरेचशे नागरिकांचे कामे देखील बंद आहे, त्यामुळे आर्थिक बाबच उपलब्ध नसल्याने ब-याचशा नांगरिकांवर उपासमारिची वेळ आलेली आहे. तसेच घरातील प्रमुख कर्ता हे त्यांच्यावर अवलंबुन असणा-या कुटुंबातील व्यक्तिंचे निदान दोन वेळेचे का होईना पोट भरता येईल या आशेने कुटुंब प्रमुख आपापल्या प्रभागांतील नगरसेवक यांच्याकडे शेवटचा पर्याय म्हणुन वारंवार संपर्क कार्यालये गाठुन धान्य मिळण्याकरिता विनवणी करताना दिसत आहेत, त्यांची ही दयनिय अवस्था पाहुन यावर आपल्या शहरातील महानगरपालिकेमार्फत शहरातील विकास कामांकरिता राखीव ठेवण्यात आलेला निधी हा शहरातील गरुजुवंतांना धान्य वाटपा करिता वापरण्यात यावा व त्यांच्या वर आलेली उपासमारीची वेळ घालवता येईल. असे केल्याने इतर कोणत्याही परिस्थितीत (दंगलदृश्य, लुटमार) नागरिकांना सामोरे जावे लागणार नाहीत. व आम्हा नगरसेवकांच्या माध्यमातुन प्रत्येक प्रभागात धान्य पुरवठा गरजुवंतांपर्यंत पोहचवता येईल. धान्य हे महानगरपालिकेने खरेदी करावे व म.न.पा.च्या मोकळ्या जागेंमध्ये सोशल डिस्टंन्स राखुन नगरसेवकांच्या व म.न.पा. कर्मचारी/अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली वाटप करावे. या धान्य वाटपामध्ये भविष्यात जर काही भ्रष्टाचार झाल्याचे योग्य पुरावे समोर आले तर संबंधीत नगरसेवकांचे नगरसेवक पद ताबडतोब रद्द करुन पुढील पंचवार्षिक मध्ये त्यास निवडणुक लढण्यास मनाई करावी व त्यासोबत नेमणुक करण्यात आलेल्या नियंत्रित अधिका-यावरही सेवानिलंबणाची कारवाई करावी. जे णे करु ख-या अर्थाने गरजवंतां पर्यंत धान्य पुरवठा होईल.तरी या प्रस्तावाचा त्वरित विचार करुन मा.महापौर व पक्षनेत्यांसोबत संबंधित धान्य वाटपा बाबतच्या विषयावर चर्चा करुन त्वरित निर्णय घ्यावा.