नियोजनात चुका होत असल्याने रुग्ण वाढत आहेत – नितेश राणे

0
593

 

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. काल नव्याने २३२ रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात ३६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरातील २९५ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात ५२ हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते म्हणतात, ‘सरकारचे काम मोजायची फुटपट्टी म्हणजे रुग्ण किती वाढले. केरळात आपल्यापेक्षा जास्त रूग्ण होते मात्र तेथील प्रशासनाने योग्य नियोजन करून काम केले , त्याचा परिणाम दिसला. तेथील रुग्ण कमी झाले’.

पुढे राणे म्हणाले, ‘राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी का वाढत आहे? शासन आणि प्रशासन काय करतय? नियोजनात चुका होत असल्याने रुग्ण वाढत आहेत,’ असं म्हणत ठाकरे सरकारवर नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. या बाबत चे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.