पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार विषय समित्यांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या नगरसेवकांची निवड

0
305

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा या चार विषय समित्यांची एक वर्षांची मुदत संपणार आहे. त्यामुळे या चारही विषय समित्यांवर सोमवारी (दि. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन नगरसेवकांची निवड करण्यात आली. प्रत्येक विषय समितीत भाजपचे पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची वर्णी लावण्यात आली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. स्थायी समितीनंतर महत्त्वाची समिती समजली जाणाऱ्या विधी समितीवर भाजपच्या माई ढोरे, अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, कमल घोलप आणि मनिषा पवार यांची, तर राष्ट्रवादीच्या उषा वाघेरे, सुलक्षणा धर आणि उषा काळे यांची तसेच शिवसेनेचे प्रमोद कुटे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.