पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार विषय समित्यांवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या नगरसेवकांची निवड

0
598

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा या चार विषय समित्यांची एक वर्षांची मुदत संपणार आहे. त्यामुळे या चारही विषय समित्यांवर सोमवारी (दि. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन नगरसेवकांची निवड करण्यात आली. प्रत्येक विषय समितीत भाजपचे पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची वर्णी लावण्यात आली.

महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. स्थायी समितीनंतर महत्त्वाची समिती समजली जाणाऱ्या विधी समितीवर भाजपच्या माई ढोरे, अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, कमल घोलप आणि मनिषा पवार यांची, तर राष्ट्रवादीच्या उषा वाघेरे, सुलक्षणा धर आणि उषा काळे यांची तसेच शिवसेनेचे प्रमोद कुटे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

शहर सुधारणा समितीवर भाजपच्या आशा धायगुडे-शेंडगे, सुनीता तापकीर, कैलास बारणे, राजेंद्र लांडगे आणि लक्ष्मण सस्ते यांची, तर राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर, संतोष कोकणे आणि संजय वाबळे यांची तसेच शिवसेनेच्या रेखा दर्शले यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण समितीवर भाजपच्या भीमाबाई फुगे, निर्मला कुटे, साधना मळेकर, उषा मुंडे आणि सुजाता पालांडे यांची, तर राष्ट्रवादीच्या सुमन पवळे, निकिता कदम आणि अनुराधा गोफणे यांची तसेच शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीवर भाजपचे तुषार हिंगे, अभिषेक बारणे, बाबा त्रिभुवन, विकास डोळस आणि सागर गवळी, तर राष्ट्रवादीचे विनोद नढे, राजू मिसाळ आणि अपर्णा डोके यांची तसेच शिवसेनेचे निलेश बारणे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.