पिंपरी चिंचवडमध्ये आज १०५०९ लाभार्थींचे लसीकरण

0
231

पिंपरी,दि.१२(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर आज १०५०९ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या दि.१३/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.

फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस १०० च्या क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन देण्याची कार्यवाही सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे. तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे अशी विनंती महापालिका प्रशासनाने केली आहे.