दिलासादायक ,पुणे विभागातील 11 लाख 69 हजार 749 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

0
188

पुणे , दि. १२ (पीसीबी) पुणे विभागातील 11 लाख 69 हजार 749 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 लाख 56 हजार 115 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 60 हजार 495 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 25 हजार 871 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.26 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 33 हजार 516 रुग्णांपैकी 8 लाख 28 हजार 296 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 90 हजार 670 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.73 टक्के आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 27 हजार 196 रुग्णांपैकी 1 लाख 261 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 410 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 21 हजार 449 रुग्णांपैकी 1 लाख 1 हजार 156 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 986 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 307 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 93 हजार 465 रुग्णांपैकी 73 हजार 687 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 71 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 707 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 80 हजार 489 रुग्णांपैकी 66 हजार 349 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 358 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 13 हजार 992 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 714, सातारा जिल्ह्यात 1 हजार 724, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 687, सांगली जिल्ह्यात 1 हजार 373 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1494 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 218 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 775, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 403, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 703, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 265 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 72 रुग्णांचा समावेश आहे.
विभागामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 24 लाख 9 हजार 89, सातारा 6 लाख 55 हजार 591, सोलापूर 4 लाख 33 हजार 318, सांगली 6 लाख 20 हजार 7 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 10 लाख 67 हजार 290 नागरिकांचा समावेश आहे.