पिंपरीत साधू वासवानी यांच्या जयंतीनिमित्त रथयात्रा

0
547

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) – साधू वासवानी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त साधू वासवानी मिशनच्या वतीने पिंपरीत आज (सोमवार) रथयात्रा काढण्यात आली.

रथयात्रेला ओपन लॉन्स अनंतपूर-कुटीया येथून सुरूवात करून साई चौक मार्गे वर्ल्ड स्कूल मैदानावर रथयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी काजल चंदीरामानी यांचे भजन व दादा जे.पी. वासवानी यांचे रूह-रिहान हा सिंधी भाषेतील सत्संग झाला.

यावेळी सिंधी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.