वरवरा राव यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात केले दाखल

0
821

पुणे, दि. १९ (पीसीबी) – कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना आज (सोमवार) ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राव यांना पुणे सत्र न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

एल्गार परिषदेचे आयोजन आणि त्यानंतर झालेल्या कोरेगाव-भीमा दंगली संबधी प्रकरणात वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सर्वोच न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालय आणि हैदराबाद उच्च न्यायालयाने दिलेली नजर कैदेची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा हैदराबाद येथून ताब्यात घेऊन रविवारी पुण्याच्या सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.