प्लास्टीक बाटली तयार करणारे मशिन देण्याचे सांगून १६ लाखांचा गंडा

0
639

चाकण, दि. ६ (पीसीबी) – प्लास्टीक बाटली तयार करण्यासाठी लागणाऱ्या दोन मशिन एका महिन्यात देतो, अशी बतावणी करून  आरटीजीएस द्वारे १६ लाखांची रोकड घेऊन मशिन न देता गंडा घातला. हा प्रकार चाकण येथे घडला.

प्रशांत सुर्यवंशी (रा. हिमालय सोसायटी, घाटकोपर, मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. महेश हनुमंत नील (वय ३२, रा. पोलाईट हेरिटेज, मेदनकवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याची मुंबईत अंधेरी येथे मंजिरी इंजिनिअरींग या नावाची कंपनी आहे. फिर्यादी महेश यांनी त्यांना प्लास्टीक बाटली तयार करण्याची ऑर्डर दिली. प्रशांत यांनी त्यांना एका महिन्यात मशिन देतो, असे सांगितले. त्यानुसार दोन मशिनचे दरपत्रकही दिले. या दरपत्रकानुसार महेश यांनी ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या चाकण शाखेत कर्ज म्हणून जमा झालेली १६ लाख १५ हजाराची रोकड आरोपी प्रशांतच्या कुर्ला नागरी सहकारी बँकेच्या साकीनाका शाखेत आरटीजीएस द्वारे ट्रान्सफर केले. या बदल्यात प्रशांतने महेश यांना सुरक्षा म्हणून चार धनादेश दिले होते. मात्र, पैसे मिळूनही प्रशांतने महेश यांना मशिन दिल्या नाहीत. तसेच महेश यांच्याकडे असणारे चारही धनादेश बाऊन्स झाले.

चाकण पोलीस तपास करत आहेत.