पिंपरीतील २८ रोडरोमियोंवर पोलिसांची कारवाई; पालकांच्या समोर दिला समज

0
806

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरीतील जय हिंद कॉलेज, नवमहाराष्ट्र महाविद्यालय, डॉ.डी.वाय पाटील कॉलेज संत तुकारामनगर आणि चिंचवड मोहननगर येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या आवारात पिंपरी पोलिसांनी बुधवारी (दि.३) महाविद्यालयाचे विद्यार्थी नसताना देखील शाळेच्या आवारात आणि गेट समोर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या २८ रोडरोमियोंना ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या २८ रोडरोमियोंच्या पालकांना बोलवून त्यांच्या समोर या मुलांना समज दिला असून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करुन सोडून देण्यात आले आहे. शाळा महाविद्यालय परिसरात होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची अचानकपणे केली जाणारी कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती पिंपरी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली आहे.