पिंपरीतील किंकबॉक्सिंग स्पर्धेत आर्यन मार्शल आर्टस संघाचा प्रथम क्रमांक

0
946

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – आर्यन मार्शल आर्टसच्या वतीने पिंपरीतील संत तुकाराम महाराज सभागृहात ३३ व्या पिंपरी-चिंचवड जिल्हास्तरिय सिनियर निवड चाचणी कँडेट व ज्युनिअर किंकबॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत संत तुकारामनगरच्या आर्यन मार्शल आर्टसने १९८ गुणांसह ४४ सुवर्णपदक, २१ रौप्य पदक आणि २४ कास्यपदक मिळवित प्रथम क्रमांक पटकावला.

काळेवाडीच्या महर्षी मार्शन आर्टसने ७५ गुणांसह, १७ सुवर्णपदक, ९ रौप्यपदक, आणि ९ कास्यपदक मिळवित व्दितीय क्रमांक पटकावला. तर ७० गुणांसह थेरगावच्या न्यु इंग्लिश स्कुलने १७ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कास्यपदक मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच चतुर्थ क्रमांक मोशीच्या प्रियदर्शनी स्कुलने १० सुवर्ण, ६ रौप्य आणि १० कास्यपदकासह ५२ गुण पटकाविले.

यावेळी किक बॉक्सिंग स्पर्धेचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेकर, सागर रेवाळे, सचिव इकबाल शेख, कार्याध्यक्ष सचिन बनसोडे, उपाध्यक्ष रवि गायकवाड, सहसचिव सागर कोळी, जनिम शेख, परवेज शेख, ऐश्वर्या नरूटे, अनिकेत भालचिम आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन मोईन बागवान, विजय ढोबले, शुभम कानडे, प्राची सुतार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इकबाल शेख यांनी केले तर सागर कोळी यांनी आभार मानले.