डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट’ ग्रंथाचे प्रकाशन

0
655

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – येथील मोरया हॉस्पीटलचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर  यांनी निरूपण केलेल्या ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संत  साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी डॉ. गिरीश आफळे, अस्मिता वाचासुंदर, डॉ. अरविंद पंडित, सतीश वाचासुंदर, शशिकांत मेढेकर, वृंदाताई खुर्जेकर, सारीका मोरे, भगवान तांबे आदी उपस्थित होते. यावेळी हॉस्पीटलला १ कोटीची देणगी दिल्याबद्द्ल वृंदा खुर्जेकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमापूर्वी कर्मचाऱ्यांनी ग्रंथदिंडी काढली. शीतल माने यांनी अभंग सादर केला. सोपान काटे, शिवाजी ढेबे,  सुरज राक्षे, चिंधू बुचढे, संगिता क्षेत्रिय, रिध्दी देशमुख, कांता काटे, माई काटे, यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे मोरया हॉस्पीटलने संयोजन केले. मृणाल कुलकर्णी डॉ. अंजली शेंदरकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गिरीश आफळे यांनी आभार मानले.