पावसामुळे ‘लालबागच्या राजा’चे सहजतेने होतेय दर्शन

0
547

मुंबई, दि.५ (पीसीबी) – पावसामुळे लालबागमधील गणेश भक्तांची गर्दी मोठया प्रमाणात कमी झाली असून अत्यंत सहजतेने लालबागच्या राजाचे दर्शन घेता येत आहे. एरवी इथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन तास थांबून रहावे लागते. पण सध्या इथे अत्यंत सहजतेने दर्शन होतं आहे.

नवसाच्या रांगेमधून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी एरवी १० ते १२ तास लागतात पण आता अवघ्या तीन तासात दर्शन होत आहे. पावसामुळे मोठया संख्येने गणेशभक्तांची संख्या कमी झाली आहे. पावसाने विश्रांती घेतली तर पुढच्या तीन दिवसात इथे गर्दी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. काल मुखदर्शनाच्या रांगेतून अनेक भाविकांनी १० ते १५ मिनिटात लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

लाखोभाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबईसह महाराष्ट्रातून लाखोभाविक लालबागमध्ये येत असतात. लालबागच्या राजासह मुंबईच राजा, चिंतामणी, तेजुकाय ही प्रसिद्ध गणेश मंडळे या भागामध्ये आहेत. पावसामुळे या भागातील गर्दी सध्या कमी झाली आहे.