पादचाऱ्याचा मोबाईल  हिसकावणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी केले अटक

0
516

भोसरी, दि. २ (पीसीबी) – कामावरून घरी जाताना रस्त्यात थांबून मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी हेडफोन लावत असताना तरूणाचा मोबाईल हिसकावून नेणाऱ्या  चोरट्याला एमआयडीसी भोसरी पोलीसांनी अटक केले आहे. ही घटना भोसरी एमआयडीसीत सेक्टर सातमध्ये घडली.

राजकुमार भवाने कामी – बीके (रा. खान्देशनगर, मोशी, मुळ – नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दिनेश बीके हा फरार आहे. याप्रकरणी महेश बापू कांबळे (वय २२, रा. बिजलीनगर, आकुर्डी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि.३१ मार्च) रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी महेश कामावरून पायी घर चालला होता. मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी हेडफोन लावण्याकरिता तो रस्त्यात थांबला. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्याच्या हातातील १९ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. महेशने त्वरीत हा प्रकार पोलिसांना कळविला. पोलिसांनी काही वेळातच आरोपी राजकुमार याला जेरबंद केले. मात्र त्याचा साथीदार दिनेश बीके हा पसार झाला. भोसरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.