भोसरीत अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक करुन बलात्कार

0
662

भोसरी, दि. २ (पीसीबी) – एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक करुन तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच ती तरुणी गरोदर राहिली. ही घटना भोसरी येथे घडली.

याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रतिक विठ्ठल सोळंकी (रा. भोसरी) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०१८ पासून आरोपी प्रतिक याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर वेळोवेळी तिच्या घरी जाऊन बलात्कार केला. यातून मुलगी गरोदर राहीली. याप्रकरणी प्रतिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार सावर्डे अधिक तपास करत आहेत.