चंद्रकांत पाटील अवैध धंदे करणारे दोन नंबरचे मंत्री; राजू शेट्टींचा घणाघाती आरोप  

0
507

कोल्हापूर, दि. २ (पीसीबी) – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील राज्यातील दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे दोन नंबरवाले मंत्री आहेत. भाजपकडे शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची माहिती आहे, अभियंत्यांकडून किती घेतले, ठेकेदारांकडून किती घेतले, मातीत किती घेतले ही सगळी माहिती आणि पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो. तुम्हीही तुमच्याकडील माहिती घेऊन या, असे थेट आव्हान खासदार  राजू शेट्टी  यांनी मंत्री पाटील यांना दिले आहे.  

साखर कारखानदारांसोबत सेटलमेंट करून घर भरल्याचा  आरोप सिद्ध करुन दाखवा, असेही आव्हान राजू शेट्टी या्ंनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे.  तुमच्याकडे  ईडी, आयकर विभाग, सीआयडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा आहे. त्यांच्यामार्फत चौकशी करा आणि आमच्यावर कारवाई करा, असेही शेट्टींनी  म्हटले आहे.

शेट्टी पुढे म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रांमध्ये माणसाचे आयुष्य हे खुल्या पुस्तकाप्रमाणे असले पाहिजे आणि ते जनतेला कळाले पाहिजे. जो माणूस लोकांकडून पाच-दहा हजार उसने मागत होता, तो माणूस आता घरी गेले की किती पैसे पाहिजेत, असे विचारतो.  इतके पैसे कुठून आणले हे कळणे गरजेचे आहे, असेही शेट्टी  म्हणाले.