पादचारी महिलेचे दागिने हिसकावले

0
141

देहूगाव, दि. १९ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास परंडवाल चौक, देहूगाव येथे घडली.

याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास परंडवाल चौकातून पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादींच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. त्यातील काही भाग चोरट्यांच्या हाती लागला. १५ हजारांची सोन्याची तुटलेली साखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.