पाच राज्यातील पराभवानंतरही संघाकडून मोदींच्या कामाचे कौतुक

0
767

नागपूर, दि. १८ (पीसीबी) – पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालावरून भाजपविरोधात नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकां   जवळ येतील, तसे भाजपाविरोधात राजकीय वातावरणात आणखी  तीव्र होईल. मात्र, घोटाळ्यांविरोधात भाजप सरकार ज्या प्रकारे काम करत आहे, ही गोष्ट विरोधीपक्षांना रुचत नाही. त्यामुळे भाजपवर होत असलेल्या राजकीय हल्लांचा ते फायदा उठवत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोधी पक्षांवर टीका केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्यमध्ये भाजपच्या पराभवावर चर्चा करण्यात आली आहे. मुखपत्रात म्हटले आहे की, माध्यमं, सोशल मीडिया सर्व भाजपाच्या विरोधात हल्ले करीत आहेत. या निवडणुकांचा निकालावर भाजपाचाविरोधात नाराजी दिसून येत  आहे. त्याचबरोबर या लेखामध्ये मिशेल-मल्या आणि हेरॉल्ड प्रकरणांचा उल्लेख करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकासकामांचेही यात कौतूक करण्यात आले आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यावरही या मुखपत्रात  टीका करण्यात आली आहे. राम मंदिर, गोवंश, कलम ३७० आणि ३५ए हे विकासाचे मुद्दे भलेही नसले, तरी ते भाजपच्या जाहीरनाम्याचे अभिन्न भाग आहेत. या मुद्द्यांशी भाजप समर्थकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या गोष्टींचा समावेश न करता याचे विश्लेषण होऊ शकत नाही, असे या लेखात म्हटले आहे.